| पुणे | वृत्तसंस्था |
ओतूर ता.जुन्नर येथील पोलिसांकडून गोमांस वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी ही गोमांसासह जप्त करण्यात आली, असल्याची माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली. नासिर मोहम्मद शेख, (वय ३८) रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर, ता. संगमनेर, असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या ताब्यातील मारुती सुपर कॅरी गाडी नंबर एम एच १२ क्यु डब्लू २८७१ ही गाडी १५०० किलो जनावरांचे मास अंदाजे किंमत ३ लाख रूपये ताब्यात घेतले आहे.
या बाबत ओतूर पोलिसात ऋषिकेश मल्हारी शेलार, (वय २५) रा. ओतूर, ता.जुन्नर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत ठाणे अंमलदार बाळशीराम भवारी सांगितले शनिवारी (दि.9) रात्री आठवाजता नगर कल्याण महामार्गावर कोळवाडी येथे गोरक्षक तरूण व कोळवाडी ग्रामस्थ यांनी शंका आल्याने पांढर्या रंगाची मारुती सुपर कॅरी गाडी थांबली आणि गाडीच्या आत तापासनी केली. गाडीत भाजी पाल्याच्या पिशव्यांच्या मागे बेकायदेशिररित्या कत्तल केलेल्या जनावरांचे मुंडके, अर्धवट तुटलेले पाय, व इतर मांस आढळून आले. त्यानंतर नागरीकांनी पोलिसांना खबर दिली. ओतूर पोलिसांनी नासिर शेख व सदर गाडी आणि गाडीतील सर्व मांस ताब्यात घेतले असून पंचासमक्ष वैदयकिय विश्लेषणासाठी गोमांस सॅम्पल काढून घेवुन उर्वरीत बेकायदेशिर कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस विल्हेवाट लावण्या करता ओतूर ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढिल तपास सहायक पोलिस निरीक्षक एल.जी.थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बी.ए.भवारी करत आहे.







