पेपर फोडणार्‍यास एक कोटींचा दंड

| मुंबई | प्रतिनिधी |

देशात नीट आणि यूजीसी परीक्षांमध्ये पेपरफुटीसह अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर शुक्रवारी (दि. 5) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक मांडले असून, दोषींना 3 ते 10 वर्षांची शिक्षा तसेच 1 कोटी रुपयांचा भरभक्कम दंड अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये होणार्‍या पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याचा सरकारने निर्णय घेतला असून, त्यामुळे पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांच्या घटनांना चाप बसणार आहे. यामुळे परीक्षेतील तोतयागिरी, फसवेगिरीला वचक बसेल असे शंभूराज देसाई यांनी म्हटले.

Exit mobile version