। अलिबाग । प्रतिनिधी ।
खोपोलीजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. तसेच, या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. रघुनाथ प्रभु (33) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे. गाडी खाली चिरडल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. तसेच, अनिल म्हेत्रे व इतर दोन असे तीन जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ खोपोली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.