कंपनीमधील विषारी वायू निर्मितीमुळे एकाचा मृत्यू

| पुणे | वृत्तसंस्था |

दौंड येथील एका खाजगी कंपनीमध्ये रासायनिक ऍसिडचे ड्रम पडल्याने भीषण आग लागलेलीची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निबंबाचा वापर केल्याने तयार झालेल्या विषारी वायूतून एकाचा मृत्यू, तर दोघे जण अत्यवस्थ झाले आहेत.

ही घटना गुरुवार (दि.२८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वेस्टन मेटल प्रायव्हेट लिमिटेड भांडगाव या कंपनीमध्ये घडली. या घटनेमध्ये अमोल सुरज चौधरी (30) दौंड-पुणे या कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, पंकज जाधव राहणार भरतगाव – दौंड, भगवान पुजारा यवत या कामगारांवरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Exit mobile version