गाढी नदीत बुडून एकाचा मृत्यू

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
तालुक्यातील शांतीवन -भानघर येथील गाढी नदीत बुडून 35 वर्षीय अनिल चव्हाण (राहणार मानखुर्द) याचा मृत्यू झाल्याची घटना 27 जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. पोलिस, अग्निशामक दल व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह सात वाजता बाहेर काढण्यात आला.

मानखुर्द येथील सहा ते सात जण मौजमजा करण्यासाठी पनवेल तालुक्यातील शांतीवन-भानघर येथील गाढी नदीत आले होते. यावेळी अनिल चव्हाण हा पाण्यामध्ये पाहण्यासाठी गेला व तो पाय घसरून खाली पडला. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा यात बुडून मृत्यू झाला. यावेळी त्याच्या सहकाऱ्यांनी 100 नंबर वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. काही वेळाने पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस त्या ठिकाणी आले.

सोबत अग्निशामक दलाचे जवान देखील आले. पोलीस, अग्निशामक दल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या अनिल चव्हाण यांचा मृतदेह शोधण्यात आला. सायंकाळी सातच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडून आला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version