जिल्हाभरात एक तास श्रमदानाचा

स्वच्छतेतून महात्मा गांधींना अभिवादन

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‌‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात 1 ऑक्टोबरला ‌‘एक तारीख-एक तास’ हा श्रमदानाचा उपक्रम राबवून राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुनसार जिल्हाभरात सकाळी दहाला एकाच वेळी श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सर्व नागरिक तसेच सामाजिक संस्था, श्री सदस्य, युवक मंडळे यांनी या अभियानात सहभागी घेते गावाच्या स्वच्छतेसाठी योगदान दिले. या अभियानात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.

पेण शहरात स्वच्छता मोहीम उत्साहात

पेण नगरपालिकेने म्हाडा कॉलनी, तहसिल व पेण पोलीस ठाणे, विश्वेश्वर स्मशानभूमी भोगावती घाट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा परिसर, पेण एस.टी. स्टॅड, उपजिल्हा रुग्णालय पेण, प्रांत कार्यालय पेण, आर.पी.नगर शाळा क्र. 9, म्हाडीक वाडी शाळा क्र.7 आणि चिंचपाडा रोटरी गार्डन अशा 10 ठिकाणी हा स्वच्छता अभियान पार पडला. या अभियानात लोकप्रतिनिधींपेक्षा मोठया प्रमाणात सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते.


यामध्ये पेण तहसिलदार स्वप्नालि डोईफोडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी जिवन पाटील, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ, जिल्हा उपरुग्णालयाच्या वैदयकीय अधिक्षक संध्या रजपूत, पेण नगरपालिकेचे किरण शहा, शिवाजी चव्हाण, रमेश देशमूख, अंकीता इसाळ, विनायक बनसोडे, सुहास कांबळे, उमंग कदम, रेशम करबेले, निकीता पाटील, अबासाहेब मनाळ, भरत निंबरे यांच्यासह मोठया प्रमाणात कर्मचारीवर्ग होते तर तहसिल कार्यालयातून सुचिता निंबरे, व तलाठी वर्ग उपस्थित होता. पेण पोलीस ठाण्यातून मोठया प्रमाणात पोलिस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. तर लोकप्रतिनिधींमध्ये मा. नगराध्यक्षा प्रितम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, मा.नगरसेवक संतोष पाटील, मा.नगरसेवक अजय शिरसागर, हिमांशू कोठारी, रविंद्र पाटील, मितेश शहा, हितेश पाटील, अदीसह अनेक सामाजिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतला. या अभियानाला महाराष्ट्र भूषण डॉ.श्री. नाना साहेब धर्माधीकारी यांच्या श्री सदस्यांचा मोलाचा सहकार्य लाभला. या अभियानामध्ये 269 श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता.

कोलाड परिसर केला चकाचक

कोलाड येथे श्री सदस्यांनी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबिवले. या अभियानाकरिता कोलाड पोलीस ठाण्यामधील अजित साबळे, आंबेवाडी सरपंच सुरेश महाबले, उपसरपंच कुमार लोखंडे, कोलाड हायस्कूलचे प्रा. तिरमाले, प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडीच्या वैद्यकीय अधिकारी दर्शना वरुठे, डॉ. वैभव तिवडे, ग्रामपंचायत सदस्य जगनाथ धनावडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचे आभार मानले.


कोलाड हायस्कूल येथून सकाळी 9.30 वाजता सुरू स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. यावेळी कोलाड येथील 1.रोहा रोड (मराठा पॅलेस ते पालेबुद्रुक स्टॉप), आठवडा बाजार, मुंबई गोवा हायवे (मच्छी मार्केट ते श्रीसद्गुरू कृपा हॉल, पुई), कोलाड हायस्कूल रोड, सरकारी दवाखाना, पोलीस ठाणे, लघु पाटबंधारे उपविभाग कार्यालय व वसाहत (पुई कॉलनी) येथे झाडू, कोयते, पंजा, घमेल वापरून परिसरात स्वच्छता मोहीम राबवली टॅक्टर,वाहने, जेसीबीच्या सहाय्याने ओला 8.350 टन, सुका 670 किलो इतक्या कचऱ्याची विल्हेवाट लावली. या मोहिमेत 378 श्री सदस्यांनी सहभाग घेतला.

माथेरान महाश्रमदान अभियान

या महाश्रमदानास माथेरानमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एक तास एक साथ स्वच्छता करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता श्रमदान राबविण्यात आले. या श्रमदानासाठी माथेरान मधील श्री समर्थ बैठकीच्या श्रीसदस्यांनी सुध्दा सक्रिय सहभाग घेऊन दस्तुरी विभाग त्याचप्रमाणे गावातील महत्वाच्या भागात, रेल्वे स्टेशन परिसर अशा विविध ठिकाणी स्वच्छता केली.


हे महाश्रमदान अभियान मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. नगरपरिषदेचे कर प्रशासकीय अधिकारी सदानंद इंगळे, स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत, वरिष्ठ लिपिक प्रवीण सुर्वे, अजय साळुंखे,अंकुश इचके, लक्ष्मण दरवडा, अभिमन्यू येळवंडे, स्वच्छता मुकादम अन्सार महापुळे, ज्ञानेश्वर सदगीर आणि सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

म्हसळा येथे स्वच्छता मोहीम

म्हसळा शहराच्या स्वच्छता कार्यक्रमात डॉ श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, धन्य निरंकार मंडळ, म्हसळा नगरपंचायत, पोलीस ठाणे, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन विभाग आणि शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाची शंभर टक्के पूर्तता केली.


या स्वच्छता मोहिमेत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, नगराध्यक्ष संजय कर्णिक, पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, माजी नगराध्यक्ष असल कादिरी, नगरसेवक, नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. मोहिमेमध्ये म्हसळा शहरातील परिसरात, एस. टी. स्टॅन्ड, ग्रामिण रुग्णालय, बाजारपेठ, हिंगुळडोह, वॉर्डात, गवत,झुडपे,कचरा,डेब्रिज,रस्ते आदि ठिकाणी सफाई करण्यात आली. या निमित्ताने स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला यशस्वीपणे साथ देऊन अभियानातील पहिला दिवशी खूप चांगल्या प्रमाणात सफाई केल्याबद्दल, मुख्याधिकारी विठल राठोड, नगराध्यक्ष संजय कर्णिक, पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे आदि मान्यवरांनी सर्वांचे आभार मानून धन्यवाद दिले आणी हा पंढरवडा यशस्वी करण्याचे आवाहन केले.

पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ

माणगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी पोलीस ठाणे परिसराची स्वच्छता करण्यात आली.


यावेळी चार पोलीस अधिकारी व 25 अंमलदार यांनी या स्वच्छता कार्यक्रमात सहभाग घेऊन पोलीस ठाण्याचा परिसर चकाचक केला.

रसायनीत स्वच्छता अभियान

भारतीय जनता पार्टी खालापूर यांच्यावतीने सेवा पंधरवडा अंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर अभियान आपना बाजार, मुख्य रस्ता, हातनोली गावाची स्मशान स्वच्छता करुन राबविण्यात आले.


यावेळी या मोहिमेसाठी सुधीर ठोंबरे रायगड जिल्हा उपाध्यक्ष भाजप, रामदास ठोंबरे, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, तुपगांव सरपंच रवींद्र कुंभार, नंदकिशोर सोनवणे, गणेश मुकादम, विजय ठोसर, सुयोग भालेकर, अमोल सकपाळ, संदीप पाटील, राकेश ठोंबरे, सम्राट देशमुख, सागर ओसवाल, सुशील देशमुख, परशुराम मिरकुटे, गणेश कदम, स्वप्निल नागावकर, राजेंद्र जमदाडे, नागेश खरात, अश्विनी माळी, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महास्वच्छता अभियानाला मुरुडकरांची साथ

मुरुड-जंजिरा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानाला नागरिकांनी व शालेय विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.


मुरुड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड शहरातील शिवाजी कोळीवाडा, गावदेवी पाखाडी, जुनी पेठ, लक्ष्मीखार, शेगवाडा, भंडारावाडा, सबनीस आळी, मुरुड समुद्रकिनारा, विविध आळीतुन पालिका प्रशासनाच्या सहकार्याने सहभागी स्वच्छतादूतांनी संबंधित परिसराची स्वच्छता केली. महास्वच्छता अभियान राबवून महात्मा गांधींनी स्वच्छते संदर्भात दिलेला संदेश जपत त्यांना स्वच्छतेतून आदरांजली देण्यात आली. या अभियानात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान श्रीसदस्य आदींसह कर्मचारी, अधिकारी व नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, 7.6 टन कचरा गोळा करण्यात आला.

Exit mobile version