सरसगड किल्ल्यावरून पडून एक जखमी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पालीतील सरसगड किल्ल्यावर गेलेले अंबरनाथ येथील संजीव पाटील हे पायर्‍यांवरून घसरून खाली पडले. यावेळी त्यांना देऊळवाडा येथील तरुण व नागरिकांनी खाली आणून लागलीच रुग्णालयात नेले. संजय पाटील यांच्या हाताला व पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक व तरुणांनी त्यांना कापडी स्ट्रेचरवर उचलून खाली आणले. व उपचारासाठी पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. संजय पाटील यांना किल्ल्यावर खाली आणण्यासाठी देऊळवाडा येथील अक्षय दंत (भारतीय सैन्यदल), समीर वरंडे, ओंकार जाधव, दिशांत वरंडे, शुभम वरंडे, केदार वरंडे, प्रकाश वरंडे, ज्ञानेश्‍वर जगताप, अविनाश दंत, आर्यन जाधव, सागर वरंडे, गौरव वाघमारे, प्रदीप गोळे, विनायक राऊत, सूरज वरंडे, अविनाश दंत, कुणाल सोनावळे, ऋषिकेश पोंगडे, बंटी राऊत, भाई राऊत आदी ग्रामस्थ आणि तरुणांनी मदत केली. किल्ल्यावरून कोणी खाली पडले आहे हे कळताच तात्काळ हे तरुण व नागरिक गडावर गेले आणि जखमी इसमास सुखरूप गडावरून खाली आणले व दवाखान्यात नेले.

Exit mobile version