। पनवेल । प्रतिनिधी ।
जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील निसर्ग हॉटेल समोर कोन येथे कारने रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक जखमी झाला आहे. तसेच, रिक्षा आणि कारचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन पनवेल येथे राहणारे रवी लोहार हे रिक्षा (एमएच 46 एसी 2119) घेऊन बुधवारी (दि. 06) पनवेल रेल्वे स्टेशनवरून इंडियाबुल सोसायटी कोनगाव येथे गेले होते. त्यानंतर पॅसेंजरला सोडून पनवेल रेल्वे स्टेशनकडे येत असताना रात्री दीडच्या सुमारास जुना मुंबई-पुणे हायवेवरील निसर्ग हॉटेल समोर कोन येथे पाठीमागून आलेल्या कारचालकाने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक रवी लोहार हे रस्त्यावर पडले आणि त्यांची रिक्षा बाजूला असलेल्या वाहनाला धडकली. त्यामुळे रिक्षाचे नुकसान झाले. तर रवी लोहार हे जखमी झाले. अपघातानंतर कारचालक पळून गेला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






