काशीद पुल दुर्घटनेत एकाचा मृत्यू

अलिबाग- मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवरील जुना पूल जोरदार पावसात वाहून गेला आहे. सदर घटना आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून मुरुड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. नदीत आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हा पन्नास वर्षाचा जीर्ण झालेला पूल वाहून गेला.

अलिबाग-मुरुड हा रस्ता बंद झाला आहे. एक चार चाकी वाहन व एक मोटारसायकल सह पूल कोसळला असून मोटारसायकलस्वार पाण्यात वाहून गेला. त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळाला आहे. मृत व्यक्तीचे नाव विजय चव्हाण आहे. अशी माहिती मुरूडचे नायब तहसिलदार रवींद्र सानप यांनी दिली आहे.

Exit mobile version