। मुंबई । वृत्तसंस्था ।
चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने उचलून नेले. त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान आज गुरुवारी सकाळी कामगाराचा मृतदेह मिळाला आहे. या हल्ल्यात त्याचे डोकं धडावेगळं झालं आहे.
दोन दिवसापासून या भागात वाघ फिरत आहे. वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. त्या व्यक्तीची सायकल रस्त्यावर पडलेली दिसली, गेट नंबर १३ जवळ ही घटना घडली आहे. संबंधित कर्मचारी हा CTPS मधील कुणाल एंटरप्राइजेस या कंपनी मध्ये काम करणारा होता. वन विभाग व वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे.