‘या’ खेळाडूवर एका सामन्याची बंदी

| पॅरिस | वृत्तसंस्था |

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने दमदार खेळ दाखवत उपांत्य फेरीत थाटात एन्ट्री मिळाली. मात्र, सेमीफायनल सामन्याआधी संघाला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताच्या अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घातली आहे. रविवारी (दि. 4) रोजी भारत विरुद्ध ब्रिटन सामन्यादरम्यान एफआयएच आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे तो मंगळवारी (दि.6) जर्मनीविरुद्ध होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. रविवारी ब्रिटनविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रोहिदासला रेड कार्ड दाखवण्यात आले, त्यामुळे तो दुसऱ्या क्वार्टरपासूनच मैदानातून बाहेर होता. अमित रोहिदासला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Exit mobile version