दोन बांगलादेशी तरुणींसह एकाला अटक

| रसायनी | वार्ताहर |

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील यश लॉज घोसाळवाडी येथे बांगलादेशी तरुणी रसायनी पोलिसांना आढळल्या असून, त्यांना परावृत्त करणार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बांगलादेशी महिला या कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय अनधिकृतपणे मिळून आल्या. तसेच आरोपी शिवकुमार राजदेव यादव याने लॉज येथे त्या आल्याबाबत पोलिसांना कळविले नाही, म्हणून रसायनी पोलिसांनी त्याला अटक करुन कारवाई केली. याबाबत फातीमा खातुन अबू सहीद हौलादर, जाकीयॉ सूलताना उर्फ रीपा रब्बीउल इस्लाम मोरोल, शिवकुमार राजदेव यादव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार अलिबाग पोसई टी.आर. वाघमोडे नेमणूक विशेष बांगलादेशी पथक यांच्यासोबत पानपट्टे तपास करीत आहेत.

Exit mobile version