| कोलाड | वार्ताहर |
आंबेवाडी येथील गणेश नगर येथे कालव्याच्या पाण्यात तोल जाऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.7) घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड येथील गजानन जंगम (४८) यांचा सकाळच्या सुमारास आंबेवाडी मधील कालव्याच्या पाण्यात तोल जाऊन मृत्यू झाला. या घटनेची नोंद कोलाड पोलिसात आकस्मिक मृत्यु करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास कोलाड सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेतकर, भोजकर करीत आहेत.







