दरीत कार कोसळून एकाचा मृत्यू

। सातारा । वृत्तसंस्था ।

यवतेश्वर-कास पठार रस्त्यावर गणेश खिंडीत चारचाकी गाडी तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळली. या गाडीत असणाऱ्या सात जणांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

काेरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील काही तरुण गुरुवारी (दि.01) दुपारी वर्षा सहलीसाठी कास पठारावर गेले होते. सायंकाळच्या सुमारास हे तरुण परत साताऱ्याकडे यायला निघाले होते. यवतेश्वरजवळील गणेश खिंडीत आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळली. त्याचवेळी मागून येणाऱ्या कारमधील तरुणांनी थांबून या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या जवानांना याबाबत माहिती दिली असता ट्रेकर्सचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version