| पनवेल | वार्ताहर |
पाणी सोडण्याचे मशिन चालू करण्यासाठी इलेक्ट्रीक बोर्डाचे बटन चालू करत असताना शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे. मयत व्यक्तीचे नाव रामेश्वर निशाद (55) असे आहे. हे पाणी सोडण्याचे मशिन चालू करण्यासाठी बेसमेंटमध्ये गेले होते. तेथे असलेल्या इलेक्ट्रीक बोर्डाचे बटन चालू करत असताना विजेचा शॉक लागल्याने ते बेशुद्ध झाले. तातडीने त्यांना उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.