। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
कलमार क्रेनच्या धडकेत नारपोली येथील मोहन गोमा म्हसकर (54) यांचा मृत्यू झाला. क्रेनचालक विक्रम देशमुख याने त्याच्या ताब्यातील कलमार क्रेन ही निष्काळजीपणाने चालवीत मोहन गोमा म्हसकर यांना धडक दिली. या धडकेत मोहन म्हसकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. संतापजनक बाब म्हणजे म्हसकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या अपघाताप्रकरणी विक्रम देशमुख याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.







