रायगडवाडी परिसरातून एकजण वाहून गेला

। महाड । प्रतिनिधी ।

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणार्‍या रायगड वाडी येथील रहिवासी मनोज खोपकर हे टकमक टोकाच्या परिसरामध्ये असणार्‍या धबधब्याच्या नजीक आपल्या मित्रपरिवारांसह गेले असताना वाहून गेल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून रविवारी (दि.7) सायंकाळी उशिरा प्राप्त झाली. यासंदर्भात स्थानिक प्रशासनामार्फत शोधमोहीम सायंकाळी सुरू झाली नव्हती. मनोज खोपकर हे मुंबई येथे नोकरीनिमित्त राहतात. पावसाळी ते आपल्या गावी मित्र परिवारासह आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी या परिवारातील जिवलगांसह ते टकमक टोक परिसरामध्ये असलेल्या धबधब्यावर पावसाचा आनंद व पोहण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याचे माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version