‘एक पौधा एक संकल्प’ कार्यक्रम

झुंझार युवक मंडळ पोयनाडचा उपक्रम

। रायगड/पोयनाड । प्रतिनिधी।

पोयनाड येथील झुंझार युवक मंडळाच्यावतीने झुंझारच्या क्रीडांगण परिसरात गुरुवारी (दि.4) ‘एक पौधा एक संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या माणुसकी प्रतिष्ठान या संस्थेकडून मंडळाला मोफत विविध रोपे देण्यात आली. या रोपांचे पोयनाडच्या मैदानालगत व परिसरातील मोकळ्या जागेत लागवड करून त्यांचे सुरक्षित संगोपन करण्याचा संकल्प यावेळी मंडळाच्या प्रत्येक सदस्य, खेळाडू यांनी केला. या कार्यक्रमासाठी अन्वर बुराण, महेश निकम, सूर्यकांत विधाते, किशोर तावडे, दिपक साळवी, अनंत राऊत, अजय टेमकर, अ‍ॅड.पंकज पंडित, राजेंद्र जाधव उपस्थित होते.

Exit mobile version