‘एक गाव, एक गौर’ उपक्रम यशस्वी

 आंबेत नाविवाडीत स्त्रियांनी दिला गौराईला निरोप
 आंबेत | वार्ताहर |
आंबेत नाविवाडी येथील हा गौराईचा उत्सव मोठ्या दिमाखदार डौलात साजरा केला जातो यामध्ये एक गाव एक गौर असा हा सण गेली कित्येक वर्षे  साजरा होताना दिसतोय आज गौराईला महिला वर्गाने लेझीम नाचत साश्रुपूर्ण नयनांनी निरोप  दिला.
कोरोना नियमात शिथिलता दिल्याने यंदा गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. गणरायापाठोपाठ रविवारी घरोघरी गौराईचे आगमन झालेल्या गौरींचे भाऊ गणपतीसोबत विसर्जन  करण्यात आले,गौरी आवाहनाचा दिवस म्हणजे घरात नवचैतन्याचे वातावरण निर्माण होते. चिरड्याच्या फुलांपासून  गौराईची प्रतिष्ठापना करुन पूजेत तेरड्याला विशेष मान असतो. याच तेरड्याला गौराईचा भाऊ म्हणून मुखवटा घालून सजवले जाते गौराईची साडी चोळी हिरव्या बांगड्यानी ओटी भरली जाते. रात्री बारा वाजता गौराईची आरती केली जाते त्यांनतर गौराई माहेरवाशिणीचे खेळ रंगतात.

Exit mobile version