। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या चौथ्या दिवशी एक मोठा गोंधळ झाला. 16 वर्षीय रशियन टेनिसपटू मीरा अँड्रीवाने चमकदार कामगिरी करत स्पर्धेच्या दुसर्या फेरीत ओन्स जाबेरचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत 47व्या क्रमांकाची खेळाडू अँड्रीवाने दुसर्या फेरीत सहाव्या मानांकित जाबेरचा एका तासापेक्षा कमी कालावधीत पराभव केला. जगातील टॉप-10 खेळाडूंवर रशियन खेळाडूचा हा पहिला विजय आहे.
मेलबर्न पार्क येथे तिची पहिली स्पर्धा खेळणार्या अँड्रीवाने रॉड लेव्हर एरिना येथे अवघ्या 54 मिनिटांत तीन वेळा ग्रँड स्लॅम उपविजेत्याचा 6-0, 6-2 असा पराभव केला. अँड्रीवान पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होत आहे. गेल्या वर्षी ग्रँडस्लॅममध्ये पदार्पण केले. तिने विम्बल्डन 2023ची चौथी फेरी, फ्रेंच ओपनची तिसरी फेरी आणि यूएस ओपनची दुसरी फेरी गाठली.