घाऊक बाजारात कांदा तिशीपार

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात गणेशोत्सवानतंर कांद्याचे दर हळूहळू वधारत आहेत. कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून दोन आठवड्यापूर्वी प्रातिकिलो 15-20 रुपयांनी उपलब्ध असलेल्या कांद्याची या आठवड्यात सातत्याने दरवाढ होत असून शनिवारी घाऊक बाजारात 25-31 रुपयांनी विक्री झाला आहे, तर किरकोळ बाजारात 40-45 रुपयांनी उपलब्ध आहे.

अवकाळी पडलेल्या पावसाने कांद्याच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा दाखविण्यास सुरुवात होते मात्र पावसामुळे नवीन लाल कांद्याच्या उत्पादन लांबणीवर गेले आहे. नवीन कांद्याच्या हंगामाला उशिरा सुरुवात होणार असून जुन्या कांदा देखील खराब निघत आहे. बाजारात शनिवारी 80 गाड्या दाखल झाल्या आहेत. बाजारात उच्चतम दर्जाचा कांदा कमी येत असून खराब कांदा अधिक दाखल होत आहे. त्यामुळे चांगल्या कांद्याला मागणी असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने कांद्याच्या दारात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात 20 ते 25 रुपयांवर कांदा स्थिर होता. परंतु या आठवड्यात कांद्याचे दर वधारण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या दरवाढीला सुरुवात झाली 25 ते 27 रुपयांवर गेला तर शनिवारी 25-31 रुपये किलो दराने विक्री होत आहे.

Exit mobile version