माजी पोलिसाला ऑनलाईन गंडा

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील राहणार खैरे खुर्द येथील 43 वर्षीय शाहनवाज युनूस मुकादम याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप कुमार आणि संतोष कुमार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या नावाने फेसबुक मेसेंजरवर मेसेज करून माझे मित्र संदीप कुमार यांच्याकडे असलेले फर्निचर कमी दरात विकायचे असून, संदीप कुमार आणि संतोष कुमार यांच्या खात्यात 61,500 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादीस आरोपींच्या बँकेचा खाते क्रमांक देऊन त्यावर फिर्यादीस पैसे भरायला लावून फिर्यादीची ऑनलाईन तांत्रिक पद्धतीने 61 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने रोहा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे करीत आहेत. फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि अशा फेक कॉल किंवा फेक मेसेज करणार्‍या या सायबर गुन्हेगारापासून सावध राहावे, असा इशारा नागरिकांना पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी दिला आहे.

Exit mobile version