सेवा निवृत्तधारकाची ऑनलाईन फसवणूक

। रेवदंडा । प्रतिनिधी ।
सेवानिवृत्ती धारकांच्या बँक अंकाउंटमधून युपीआयव्दारे ऑनलाईन पध्दतीने रक्कम काढून आर्थिक फसवणूक केल्याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे दोघा बँक अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिचोंटी येथील सेवानिवृत्त यांच्या बडोदे बँकेतील खात्यातून अज्ञात व्यक्तीने 1 फेब्रवारी 2022 रोजी दहा वेळा ऑनलाईन ट्रान्झेक्शन झाल्याचे, तसेच 2 फेब्रवारी 2022 रोजी 10 वेळा ऑनलाईन ट्रान्झेक्शन झाल्याचे तसेच दि.3 फेब्रवारी रोजी 9 वेळा ऑनलाईन ट्रान्झेक्शन झाल्याचे तसेच दि. 4 फेब्रवारी 2022 रोजी 7 वेळा ऑनलाईन ट्रान्झेक्शन झाल्याचे असे एकूण 36 वेेळा ऑनलाईन पध्दतीने या खात्यातून 2,56,254/-रूपये रक्कम युपिआयव्दारे ऑनलाईन पध्दतीने काढले असल्याचे निदर्शनास आले. याबाबत सेवानिवृत्ताने शाखा प्र्रबधंक बँक ऑफ बडोदा व डिजीटल ऑपरेशन हेड बँक ऑफ बडोदा झोनल ऑफिसर मुंबई यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाणे येथे आर्थिक फसवणूक केल्या संदर्भात रेवदंडा पोलीस ठाणे येथ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version