| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील पळस्पे फाटा येथील एका सेवानिवृत्त 64 वर्षीय महिलेची ऑनलाईन पद्धतीने अपसंपदेचा धाक दाखवून फोनवरुन तब्बल साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मागील महिन्यात ही घटना घडली असून दोन दिवसांत या महिलेला पोलिसांची कारवाई होईल अशी फोनवरुन भिती दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.