| पनवेल | प्रतिनिधी |
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून, लग्नाचे मुहूर्त जास्त, तर हॉलची संख्या कमी झाल्याने आता पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला पहिली पसंती सर्वजण देत आहेत.
लग्नसराईत पूर्वीच्या काळी जेवणाची पंगत जमिनीवर, त्यानंतर खुर्ची टेबलावर, आता मात्र बदलत्या युगात त्याची जागा बुफे पद्धतीने घेतली आहे. लग्न सराईच्या हटके पद्धतीत बुफे पद्धतीला मान देण्यात येत असल्याने ग्रमीण भागातसुद्धा पंगतीच्या जागी बुफे पद्धत जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सभागृहासह ओपन लॉनवर शुभमंगलला पसंती मिळत आहे. त्या जोडीला संगीतमय मंगलाष्टकांची रेलचेल आहे. बाहेरील बाजूस फोटो सेक्शनसाठी विविध आकर्षक सजावट करण्यात येत असून, लग्नसमारंभ हा इन्हेंट ठरत आहे.
विवाह समारंभांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पनवेलकर बाजारपेठसह देण्याघेण्याच्या वस्तूसाठी मुंबई-दादर, पुणे आदी ठिकाणी जात असल्याने वधू-वराकडच्या मंडळींची गर्दी दिसून येत असे. यावर्षी 16 नोव्हेंबरपासून लग्राचा बार उडण्यास सुरुवात झाली असून 6 मुहूर्त आहेत. डिसेंबरमध्ये 2 व 5 रोजी मुहूर्त आहेत, तर 2026 हे वर्ष लग्न आणि शुभ कार्यासाठी खूपच चांगले असल्याचे ज्योतिषांकडून सांगितले जात आहे.
2026 या वर्षात एकूण 59 शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे या शुभमुहूर्तावर लग्न करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या लग्र सराईसाठी पनवेल परिसरातील सभागृहासह लॉन, हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले आहेत. सद्यःस्थितीत लग्राचा ट्रेंड बदलत चालल्याने लॉनच्या मोकळ्या जागेत सायंकाळी बहुतांशी लग्न उरकण्यात येत आहे. या ठिकाणी विविध पदार्थ याची रेलचेल असते. मोठ्या शहरातील शाही विवाहाची परंपरा ग्रामीण भागात रुज्जू पाहात असल्याने या ठिकाणी राबणाऱ्या अनेक जणांना सुगीचे दिवस आले आहेत.
लग्न सराईमध्ये जेवणावळीमध्ये पंजाबीसह चायनीज पदार्थाची रेलचेल आहे. त्याच्या जोडीला जेवणावळीनंतर पान-मसालासह आईस्क्रीम जोडीला असते मोठ्या शहराप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा ही पद्धत जोर धरू लागली आहे. सध्या लग्नाचे स्वरूप बदलते होत असून, हटके लग्न सराई करण्याकडे अनेकांचा जोर आहे. त्यातच वेगवेगळे इव्हेंट, संगीत ,संगीत पार्टी आदी प्रकार वाढत चालले आहेत.
विवाहासाठी ओपन लॉनला पसंती
