बस स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृह खुले

सुधागड मनसेच्या मागणीला यश

| पाली/बेणसे । वार्ताहर ।

मागील काही महिन्यांपासून पाली बस स्थानकात बांधण्यात आलेले सार्वजनिक स्वच्छतागृह प्रवाशांसाठी बंद होते. त्यामुळे नागरिक व प्रवाश्यांची प्रचंड कुचंबणा होत होती. त्यांना इतरत्र शौचालयासाठी जावे लागत होते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी मनसे पाली शहर अध्यक्ष दिपेश लहाने व मनसे सैनिकांनी येथील सार्वजनिक स्वच्छतागृह नागरिकांसाठी सुरू करण्याचे निवेदन दिले होते. हे स्वच्छतागृह प्रवासी व नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.

मनसेने सातत्यपूर्ण पाठपुरावा करून तेथे असलेल्या काही अडचणी पाली नगरपंचायत व बस स्थानकाच्या सहकार्याने सोडविल्या आणि बस स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृह नागरिक व प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मनसे सैनिकांच्या कार्याचे तालुक्यात कौतुक केले जात असून नागरिक प्रवाशांनी आभार व्यक्त केले आहे. यावेळी भावेश बेलोसे, तेजस परबळकर, प्रतिक आंग्रे, अजिंक्य पाशिलकर, शेखर चव्हाण, संकेत वरगडे व सुरज परबलकर आदींसह मनसे सैनिक उपस्थित होते.

Exit mobile version