मुरुड पोलिसांचे संचलन

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
श्री महावीर जयंती,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, ग्रामदैवत कोटेश्‍वरी मातेची मिरवणूक-यात्रा, वीर हनुमान जयंती आगामी रमजान या सणाच्या पार्श्‍वभूमीवर मुरुड पोलीस निरीक्षक-नितिन गवारे यांच्या नेतृत्वाखाली मुरुड शहरातील ठिकठिकाणी पोलिसांनी रुट मार्च काढला. उत्सव काळात शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्ष राहत पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यावरुन हा रुट मार्च काढला. मुरुड बाजारपेठ, आझाद चौक, एकदरा पुल, कोळीवाडा परिसर व मच्छी मार्केट या मार्गाने पोलिसांनी संचलन केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत म्हात्रे, सहाय्यक फौजदार दिपक राऊळ आदिंसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version