शहाबाज येथील नेत्रचिकित्सा शिबीर

160 जणांची केली तपासणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स क्लब पोयनाड ही समाजसेवी संस्था पोयनाड पंचक्रोशीत वंचित, दीनदुबळ्यांसाठी विविध उपक्रफ राबविते. या अंतर्गत ऑक्टोबर सेवा सप्ताहाचे औचित्य साधून लायन्स क्लब पोयनाड, ग्रामपंचायत शहाबाज आणि हेल्थ फाउंडेशन चोंढी-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहाबाज येथे गरजू बांधवांसाठी नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत शहाबाजच्या समोरील मराठी शाळा येथे हे नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 160 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यापैकी 35 जणांंच्या डोळ्यात मोतीबिंदू आढळून आले. त्यांच्यावर चोंढी येथील लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिराकरीता शहाबाजचे सरपंच धनंजय म्हात्रे, ग्रामसेवक वैभव ठाकूर, लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, प्रदीप सिनकर, मनीष अग्रवाल, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष विनोद पाटील, सचिव प्रगती सिनकर, खजिनदार विकास पाटील, सदस्य महेंद्र पाटील, अरविंद अग्रवाल, लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष मोहन पाटील, जितेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. हे शिबीर लायन्स हेल्थ माऊंडेशनच्या डॉ. सायली केणी व त्यांचे सहकारी यांनी यशस्वी केले.

Exit mobile version