नवरात्रोत्सव हा भारताच्या सनावळीतील सर्वात मोठ्या सणांपैकी एक भारतातील समुद्र पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कॉर्डेलिया क्रुझ तर्फे नवरात्री विशेष सफारी आयोजित केली आहे. या क्रूजवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद पाहुण्यांना घेता येणार असून यातील पर्यटकांना सोमनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी क्रूझ बंदरावर थांबवली जाणार आहे.
विशेष म्हणजे या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये क्रूझवर पूर्णपणे शाकाहारी जेवण दिलं जाणार आहे. या क्रूझमध्ये मोठं फूड कोर्ट असून त्यात तीन स्पेशल रेस्टॉरंटचा समावेश आहे जहाजाच्या प्रत्येक भागाला नवरात्र उत्सवाचे स्वरूप देण्यासाठी विचारपूर्वक बदल केले गेले आहेत. हे पारंपारिक रंगछटांद्वारे आणि सौंदर्यात्मक सजावट केली गेली आहे. पारंपारिक ‘आरती’, शंख ढोल आणि अगदी पाकळी वर्षावाने भरलेल्या सर्व पाहुण्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. या गरबा क्रूझसाठी तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सोबत नेऊ शकता. या सफारीचे विशेष आकर्षण आहे ते म्हणजे प्रसिद्ध गायक पार्थीब गोहिल यांचा लाईव्ह कार्यक्रम पर्यटकांना अनुभवात येणार आहे ,
यासोबतच पारंपरिक संगीताचा कार्यक्रम, डीजे नाच आणि स्टॅण्डअप कॉमेडीचं आयोजन करण्यात येणार आहे. १८ महिन्याच्या मोठ्या कालावधीनंतर कुटुंबांसोबत नवरात्र उत्सव साजरा करण्याची मुंबईकरांना एक चांगली संधी आली आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी भारतातील सर्वोत्तम मनोरंजन कार्यक्रम, उत्तम पाककृती आणि अतुलनीय आदरातिथ्य कॉर्डेलिया क्रूझ मध्ये केले जाते.