माघी गणेशोत्सवानिमित्त पालघर विभागाचा उपक्रम
| पालघर | प्रतिनिधी |
एसटीच्या पालघर विभागाकडून गणेशभक्तांसाठी कोकण दर्शन यात्रा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त कोकणातील वैभव आणि धार्मिक स्थळांची सफर करण्याची संधी जिल्हावासीयांना मिळणार आहे. गणेश जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाने पर्यटक आणि भाविकांसाठी कोकण दर्शन पॅकेज टूरची विशेष पर्वणी आणली आहे. पालघर, सफाळे, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर आणि नालासोपारा अशा आठ आगारांतून कोकण दर्शनाकरिता या बस निघणार आहेत. किमान 40 प्रवाशांचा गट तयार झाला, तर त्या गटासाठी एसटीमार्फत बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या सवलतींचा पूर्ण लाभ मिळणार आहे.
मुरूड-जंजिरा, रायगड किल्ला संगमेश्वर, मार्लेश्वर (गुहेतील शिवमंदिर), गणपतीपुळे अशा देवस्थानांच्या यात्रेचे नियोजन आहे. बसचा मार्ग मुरूड जंजिरा-माणगाव-रायगड-संगमेश्वर-मार्लेश्वर-गणपतीपुळे आणि परतीचा प्रवास असणार आहे.
तिकीटदर (प्रति प्रवासी)
आगार – पुरुष सवलतदार (योजना)
वसई – 2,011 – 1,006
नालासोपारा -2,011 – 1,006
अर्नाळा – 2,071 – 1,036
पालघर – 2,445 – 1,223
बोईसर – 2,465 – 1,233
जव्हार – 2,462 – 1,231
सफाळे – 2,425 – 1,21
3डहाणू – 2,515 – 1,258.
समूह योजनेसाठी हा उपक्रम असून, जिल्ह्यातील भाविकांना सुरक्षित, सुखकर आणि स्वस्त दरात सेवा देणे, एसटीचे कर्तव्य आहे
कैलास पाटील, विभाग नियंत्रक, पालघर विभाग






