डाक विभागासोबत काम करण्याची संधी

। सारळ । वार्ताहर ।
केंद्र सरकारच्या ग्रामीण डाक जीवन व डाक जीवन विम्याच्या ग्रामीण व शहरी क्षेत्रांमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी आता सुशिक्षित तरुण, तरुणींना त्यासोबत वय 18 ते 50 वय असलेल्या सर्वानाच उपलब्ध झाली आहे. विमा प्रतिनिधींची नेमणुक अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्यामार्फत दिनांक 9 नोव्हेंबर रोजी ठीक 11 ते 3 वाजेपर्यंत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवाराने अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला, शैक्षणीक पात्रता, आधारकार्ड, मोबाईल नंबर, इमेल आयडी, तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रांच्या मूळप्रती घेऊन मुलाखतीला हजर राहणे गरजेचे आहे. या क्षेत्रांमध्ये त्यांच्या कामाचा मोबदला कमिशन स्वरूपात दिला जाणार आहे. भारतीय डाक विभागा सोबत काम करण्याची सुवर्णसंधीचा फायदा होतकरू तरुण, तरुणींनी करून घ्यावा असे आवाहन रायगड डाक अधीक्षक ए.जी.पाखरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version