प्रेम प्रकरणात विरोध केल्याने घेतला पुतण्याचा घेतला जीव

बोर्ले येथील मालकाच्या हत्येप्रकरणात नराधम काकाची कबुली
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा-रायगड यांनी केले गजाआड
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील बोर्ले येथील चिमुरड्याच्या हत्या प्रकरणाच उलगडा झाला असून प्रेमप्रकरणात मुलाच्या बाबांनी विरोध केल्याने आपल्या पुतण्याचा जीव घेत बदला घेणार्‍या या नराधम काकाला जेरबंद करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर 3 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
माणगाव तालुक्यातील बोर्ले येथील दोन वर्षीय रूद्र अरूण यादव याला त्याचाच चुलता संतोष अशोक यादव, फिरायला नेतो असा बहाणा करून आपल्या होंडा शाईन मोटारसायकलवरून घेऊन गेला होता. मात्र बराच वेळ होऊन देखील आपला मुलाला परत न आणल्याने चिंतेत पडलेल्या आई बाबांनी शोधाशोध सुरु केली होती. याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर
गुन्हयाचे गार्भीय ओळखून पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक महेश कदम यांचे पथक तयार करण्यात आले. अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेत असता आरोपी संतोष अशोक यादव याने अपहरण करताना वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल रोहा एस.टी.स्टॅन्ड येथे पार्क करून ठेवल्याची माहीती मिळाली. त्यानुसार सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहणी केली असता फुटेजमध्ये आरोपी सोबत अपहृत रूद्र दिसुन आला नाही. त्यामुळे लहान मुलगा रूद्र याचे आरोपीत याने बरेवाईट केले असावे याबाबत पोलीसांचा अधिक संशय बळावल्याने तपासाची चक्रे अधिक गतीमान करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीच्या मोबाईल नंबरचे तांत्रीक विश्‍लेषण केले असता सदर आरोपी मुंबई मधील एका मित्रांच्या संपर्कात असल्याचे दिसुन आले. आरोपीत याचा मित्र याचेकडे मुंबई येथे जावुन अधिक विचारपुस केली असता आरेापीत याची पुर्वीची सिल्वासा (दमण दिव) रा.गुजरात या मैत्रीणीबाबत विचारपुस करीत असल्याचे समजले. त्यानंतर सदर आरोपीत याचा शोध घेत स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेकडील टिम ही सिल्वासा ( दमण दिव ) येथे रवाना होवुन आरोपीची मैत्रीण राहत असलेल्या बिल्डींग जवळ त्याला पकडण्यासाठी सापळा रचुन संतोषयादव तेथे येताच त्याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडे रुद्रबाबत विचारपुस केली असता त्याने त्यालाठार मारून रोहा हददीत टाकुन दिल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे आरोपीत याने सांगीतलेल्या परीसरात बालकाच्या मृत देहाचा शोध घेतला. त्यानंतर बालकाच्या मृत देहाचे पोस्टमार्टेम करून मृतदेह त्याचे पालकाचे ताब्यात देण्यात आलेला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक माणगाव पोलीस ठाणे अश्‍वनाथ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक महेश कदम, हवालदार यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, नाईक राकेश म्हात्रे, चालक पोलिस हवालदार देवराम कोरम व सायबर सेल शाखेचे नाईक अक्षय पाटील या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश खेडकर हे करीत आहेत.

Exit mobile version