आत्करगावातील जैविक कचर्‍याच्या कारखान्याला विरोध

पाच ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांचे जिल्हाधिकार्‍यांंकडे साकडे
| खोपोली | संतोषी म्हात्रे |

मुंबईतील विविध रूग्णालयातील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा एसएमएस नावाचा कारखाना आत्करगाव येथे येेेेउ घातला असून जैविक कचर्‍यामुळे परिसरात प्रदुषण होत नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न होईल. त्यामुळेच, हा कारखाना सुरू होउ नये यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर दि. 16 मार्च 2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. यादरम्यान ग्रामस्थांनी विरोध केल्यावर ना हरकत दाखला रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.तर साजगांव पंचक्रोशीतील पाच ग्रामपंचायतींचा विरोध असतानाही दि.13 ऑगस्ट 2021 रोजी लावलेली जनसुनावणी बेकायदेशीर आहे.त्यामुळे आत्करगावात जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा कारखाना नको या मागणीचे निवेदन पत्र जिल्हाधिकारी निधी चौधरी,खालापूर तहसिलदार इरेश चप्पलवार,स्थानिक आमदार महेंद्र थोरवे,पंचायत समिती उपसभापती विश्‍वनाथ पाटील, गटविकास आधिकारी संजय भोये यांच्याकडे दिले आहे.तर कोरोना काळात होणार्‍या जनसुवणीत 400 ते 500 ग्रामस्थ उपस्थित राहतील याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असे मत शेकाप तालुका चिटणीस तसेच माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे.

खालापूर तालुक्यातील आत्करगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स.नं-231 मधील जागेत एस.एम.एस.एन ओल्वीन प्रा.लि.कंपनी जैव वैद्यकीय कचरा निवारण प्रकल्पासाठी खरेदी करीत आहेत.यासाठी ग्रुप ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला घेतला होता.सदर जागेपासून 200 मी अंतरावर गाव नदी तसेच 500 मी अंतरावर पाझर तलाव,आत्करगांव,आडोशी,चिंचवली,टेंबेवाडी,होनाड,कुंभेवाडी,आत्करगांव वाडी,बौध्दवाडा,जंगमवाडी बसस्थानक,हॉटेल,शाळा,कारखाने आहेत. जैविक प्रकल्प उभारल्यास कुजलेल्या कचर्‍यामुळे हवा दुषित होउन दुर्गंधी पसरेल,तसेच जंतू पाण्यात मिसळल्यास नदी तलाव दुषित होउन नदीवरील पाणी योजना दुषित होतील. साथीच्या आजारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होउ शकतो. यासाठी, सांजगाव पंचक्रोषीतील आत्करगांव ग्रामपंचायत हद्दीसह साजगांव, होनाड, देवन्हावे, सांगडे ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला.

दि. 16 मार्च 2020 रोजी आत्करगाव ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा घेउन ना हरकत दाखला करण्यात आला असताना जनसुनावणी नको यासाठी ग्रामस्थ आक्रमक होत जिल्हाधिकारी,स्थानिक आमदार,तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामस्थ शांताराम पाटील,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील,शेकाप खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील,माजी सदस्यचंद्रकांत देशमुख, उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य समीर देशमुख, मनोहर शिंदे, वसंत पाटील, गणेश पाटील, नितेश पाटील,हेमंत पाटील, भरत देशमुख, संतोष पाटील, शेकापच्या शिवानी जंगम, राम देशमुख, पुरोगामी संघटनेचे भूषण कडव यांनी देत जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणाय्रा कारखान्याला विरोध दर्शविला आहे.

Exit mobile version