| पनवेल | प्रतिनिधी |
महिलांच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी, विर वुमेन्स फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी या तिन सामाजिक संस्थानी एकत्र येऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मदतीने ‘ऑरेंज द वर्ल्ड’ या जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते.
इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी ही महिलांमार्फत चालवली जाणारी सामाजिक संस्था आहे. इथे वेगवेगळ्या स्तरातील महिला एकत्र येऊन विविध प्रकारचे समाजकार्य तसेच जनजागृती पर उपक्रम राबविले जातात. या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर या क्लबने ‘ऑरेंज द वर्ल्ड’ या थीम अंतर्गत सर्व क्लबना महिलांच्या विरोधात होत असलेल्या अन्यायाविरोधात आपापल्या क्लबमध्ये वेगवेगळ्या माध्यमांतून जनजागृती करण्याचे आवाहन केले होते.
या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून तसेच महिलां विषयी बांधीलकी जपण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीने या रॅलीचे आयोजन केले होते. वडाळे तलाव येथुन त्याचा श्रीगणेशा करण्यात आला. रॅलीमध्ये पनवेल पोलिसांनी बाईकवरून रॅलीच्या अग्रस्थानी व अन्य सर्व सदस्य शिस्तीत त्यांच्या मागोमाग यापद्धतीने रॅली प्रामुख्याने पनवेल येथील वडाळे तलाव येथुन सुरु होऊन क्रमशः जेष्ठ नागरिक हॉल, म्युनिसिपल कॉरपोरेशन, जय भारत नाका, शिवाजीपुतळा, आंबेडकर पुतळा व नंतर ब्रीजखालून पनवेलबस स्टॅडच्या रोडने पुन्हा वडाळे तलावावर येऊन रॅलीची सांगता करण्यात आली. याप्रसंगी अर्चना ठाकुर, सिंपल आंचलिया, युक्ती शाह, पीपी ध्वनी तन्ना, प्रतिभा डांगी, ममता ठक्कर, मौसमी गोगुला, वैशाली कटारिया, सीसी. प्रिया चतुर्वेदी, नम्रता बांठीया ,शिला शाह, डॉ . भावना मुरुडकर, किर्ती मुनोत, दुर्गा चौधरी, पुनम जैन, श्रुती निस्सर, सीमा जैन, हर्मेश तन्ना, रोहित जाधव, दिप्ती जाधव उपस्थित होते







