रांजणखार येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

तरुणांनी जागवला शिवरायांचा इतिहास
| अलिबाग | प्रतिनिधी |
नवरात्र उत्सव मंडळ रांजणखार नाका यांच्या पुढाकारातून शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कार्लेखिंड ते नवखार या परिसरातील 55 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिवरायांच्या विविध पैलूंवर तरुणाई झाली. दरम्यान, शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करीत मुलुख मैदानी तोफा यावेळी धडाडल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन रांजणखार ग्रामपंचायतीचे सरपंच उदय म्हात्रे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन करण्यात आले. स्पर्धेसाठी ङ्गछत्रपती शिवाजी महाराजफ आणि मोबाईलफ हे दोन विषय देण्यात आले होते. स्पर्धा चार गटात पार पडली. दरम्यान पहिली ते चौथीच्या गटात क्रमांक रुद्र रुपेश पाटील, द्वितीय वैदही लक्ष्मण वाघमारे, तर तृतीय क्रमांक हर्षिका उल्हास पाटील हिने पटकाविला. पाचवी ते सातवी या गटात प्रथम क्रमांक फिजा सलीम शेख, द्वितीय चार्वी प्रवीण पाटील, तर तृतीय क्रमांक आर्या अमृत पाटील हिने पटकाविला.

आठवी ते अकरावी गटात प्रथम क्रमांक समर्थ तेजस पाटील, द्वितीय तृष्णा मोकल, तृतीय क्रमांक स्वराली संदेश तवटे हिने पटकाविला. बारावी ते प्रौढ या खुल्या गटात प्रथम क्रमांक कृतिका हिने, तर द्वितीय क्रमांक राजेंद्र यांनी पटकाविला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पेढांबे येथील श्री. नरेंद्र सर, अविनाश पाटील-रांजणखार, अरुणा पाटील-कोल्हापूर यांनी काम पाहिले. यशस्वी करण्यासाठी नवरात्र उत्सव मंडळ रांजणखार नाकाच्या सभासदांनी मेहनत घेतली. या स्पर्धेला स्पर्धक आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Exit mobile version