| पोलादपूर । वार्ताहर ।
तालुक्यातील गोळेगणी येथील मध्य रेल्वे निवृत्त कर्मचारी राजेंद्र दगडू दळवी यांनी वनराई बंधारा बांधून फळबागेस संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था केल्याने बागेला सध्या बहर आला आहे.
मुंबईला कामानिमित्त मध्य रेल्वे येथे नोकरी करत होते. निवृत्तीनंतर आपल्या स्वग्रामी गोळेगणी येथे आल्यानंतर आपली वडिलोपार्जित पडीक शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी तालुका कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून त्यांनी माळरानावर कोरडवाहू शेती कार्यक्रमांतर्गत आंबा फळबाग लागवड 0.97 हेक्टर जमिनीवर लागवड केली आहे.
त्यांच्या शेतीमध्ये काजू, आंबा, नारळ, चिकू, सुपारी, कोकम आदी फळपिके असून शेतीला जोड म्हणून गीर गाई, कुक्कुटपालन आदी व्यवसाय करीत आपले सेवानिवृत्तीचे जीवन दळवी दांपत्य जीवन आनंदामध्ये जगत आहे. या प्रयोगाची पाहणी व मार्गदर्शन करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सुरज पाटील, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहाय्यक मनोज जाधव, प्रकाश दळवी, नितिन मोरे, प्रभाकर पवार व व शेतकरी उपस्थित होते.