पृथ्वी शॉ जाणार गजाआड?

। मुंबई । प्रतिनिधी ।

आयपीएल 2024 मध्ये दिल्लीचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या आहेत. पृथ्वी शॉविरुद्ध मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. ही घटना गेल्या वर्षी घडली होती, त्यावर न्यायालयाने आता हा निर्णय दिला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया स्टार सपना गिल यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर काही व्हिडिओही व्हायरल झाले, ज्यामध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. पृथ्वी शॉने अंधेरीतील एका पबमध्ये तिचा विनयभंग केल्याचा आरोप गिलने केला होता. मात्र शॉ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Exit mobile version