प्रितम पाटील यांचे अवयवदान

। उरण । वार्ताहर ।

उरण येथील रहिवाशी प्रितेश राजाराम पाटील (51) यांना हायपरटेन्शन त्रास असल्याने 15 जून रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना 18 जून रोजी ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर प्रितेश यांच्या कुटुंबियांनी तत्काळ अवयवदानाचा निर्णय घेतला. यकृत, किडनी, फुफ्फुस, कॉर्निया या अवयवदानामुळे 6 जणांना जीवनदान मिळाले आहे. दरम्यान, पवई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये 60 वर्षीय दिपंकर मोत्रा यांचे अवयवदान करून तिघांना जीवनदान मिळाले आहे. त्यांचे फुफ्फुस, यकृत आणि एक किडनी दान करण्यात आली आहे.

Exit mobile version