| आंबेत | वार्ताहर |
नवाब काळापासून पूर्वजांनी जपलेली पारंपरिक संस्कृती व सर्व धर्म समभावाची जोपासना करणारा म्हसळा तालुका हा अनेक जाती धर्माच्या लोकांनी सजलेला आणि नटलेला एक कोकणातील तालुका आहे. महाराष्ट्रातील पाहिले मुस्लिम मुख्यमंत्री याच तालुक्याने दिला आहे. देशात कोकणाची या विभागाची वेगळी ओळख आहे. असाच एकोपा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी ही संस्कृती ही पद्धत कायम एकतेने जोपासावी यासाठी जे. एम. एम. एज्युकेशन सोसायटी म्हसळाचे संस्थापक नाझीम चोगले यांनी 13 जानेवारीला अंजुमन हायस्कूल क्रीडांगणावर दुपारी 2.30 वाजता सर्व धर्म समभाव व बंधुता मेळाव्याचे आयोजन केले आहे.
मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी कलीम मोहम्मदी, अबू जैद जमीर, प्रा.दिगंबर टिकले, तहीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, बी.एस.भोगे गट विकास अधिकारी, संजय कर्णिक नगर अध्यक्ष म्हसळा, संतोष दौंड गट शिक्षण अधिकारी, संजय दिवेकर उपनगर अध्यक्ष, विठ्ठल राठोड मुख्याधिकारी, मनोज महाले, पनवेल, नंदू गोविलकर, महादेव पाटील, अनिल बसवत, दिलीप कांबळे, सुरेश जाधव, महेंद्र ढवळे, महादेव पाटील, सुरेश कुदेकर, सुरेश जैन, यशवंत पवार, सुजित पोटले ,कोमल वेटकोली, सुरेश महाडिक, वेदिका पाखड, जयदास भायदे, रमेश काणसे, चंद्रमा पवार, अनंत नक्ती, देवजी गाणेकर, स्वेता लटके, राजेश्री कांबळे, वनिता खोत, पांडुरंग बने, आदी मान्यवरांचा समावेश असणार आहे.