बेसिक लीगल एज्युकेशन कार्यक्रमाचे आयोजन

| अलिबाग | वार्ताहर |

ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या जयंतराव केळूसकर सभागृह येथे विधीज्ञ परिषद, महाराष्ट्र आणि गोवा व रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशन तसेच ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ यांच्या संयुक्त विदयमाने बेसिक लीगल एज्युकेशन प्रोग्राम व हॅन्ड बुक डिस्ट्रिब्युशन हा कार्यक्रम दि.22 रोजी आयोजित करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. राजदेकर, जिल्हा न्यायाधीश 1 अशोककुमार भिलार, विधिज्ञ परिषद महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲड. गजानन चव्हाण, ॲड. अनंत पाटील ॲड. राजेद्र माळी, ॲड. निकेत चवरकर, ॲड.समाधान पाटील ॲड. कौस्तुभ पुनकर, ॲड. अझर घट्टे , ॲड. पंकज पाटील, ॲड. पुजा भगत, व जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, प्रभारी प्राचार्या निलम हजारे ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉमधील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच ॲड. शिरीष लेले, ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. किशोर हजारे, ॲड. सुयोग बारटक्के, ॲड. विलास नाईक, ॲड. भूषण साळवी, ॲड. भगवान म्हात्रे उपस्थित होते.

ॲड. गजानन चव्हाण हयांनी उपस्थितांना वकिली व्यवसायाची नीतीमुल्ये हया विषयावर व्याख्यान देताना म्हणाले वकिलीचा व्यवसाय चारित्र्यसंपन्न असावा त्याच बरोबर वकिलीच्या आर्दश व्यवसायाचे बाजारीकरण होऊ नये असे सागितले. ॲड.गौतम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Exit mobile version