रक्तदान शिबिराचे आयोजन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड जंजिरा मेडिकल असोसिएशन संलग्न मुरुड श्रीराम बँक यांच्यावतीने शुक्रवारी (दि. 15) सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मुरुड कल्याणी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. राज कल्याणी यांनी सांगितले की, मुरूड-अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटल याठिकाणी एकमेव रक्तपेढी असल्याने खासगी हॉस्पिटल, तसेच ब्लड स्टोरेज सेंटर यांना रक्तपुरवठा या रक्तपेढीमार्फत केला जातो. सध्या या ठिकाणी रक्ताचा पुरवठा खूपच कमी झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाचे रक्ताविना हाल होऊ नये त्याकरिता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी माझ्या तालुक्यातील बंधू-भगिनींनो या शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. राज कल्याणी यांनी केले आहे.

Exit mobile version