| म्हसळा । वार्ताहर ।
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण रायगड यांच्यातर्फे दि.15 ते दि 19 या कालावधीत म्हसळा येथील एस.टी.स्टँड घनसार हॉलमध्ये सकाळी 11.00 वाजता नागरी संरक्षण आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन तहसीलदार समीर घारे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या पाच दिवसीय शिबीराबाबत अलिबाग येथील के.डी.पाटील, के.आर कुरकुटे, शिरसाठ , तुफैल दामाद यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. नागरी संरक्षण दलात भरती होण्यासाठी तालुक्यातील वय वर्षे 18 पूर्ण करणार्या सर्व युवक युवती, सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे निमंत्रक डॉ.मुबश्शिर जमादार, किशोर मोहिते, अ.श.घनसार यांनी सांगितले आहे.
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी मुबश्शीर जमादार 9423241784 व तुफैल दामाद 9270512858 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.