| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील वशेणी येथील हनुमान मंदिरात दिवाळी पहाट, सूर आपल्या माणसांचा या सुरेल गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन वशेणी इतिहास संपादकीय मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दीपावली सणाचे औचित्य साधून, काळानुरूप हरवत चाललेल्या भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने एक नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून, पहाटे 05.45 वाजण्याच्या सुमारास ही सुरेल गीतांची मैफल रंगणार आहे. सूर आपल्या माणसांचा या बहारदार गीतांच्या कार्यक्रमातून प्र. ना. नागडे (ठाणे), रमेश थवई (पेण), रमण पंडित (उरण), संदीप गावंड (उरण), हर्षली म्हात्रे (पेण), अक्षता गोसावी (पनवेल), रमणिक म्हात्रे (उरण), अनिल भोईर (उरण), गौरी कोरेगावकर (उरण), सानिका पाटील (वशेणी), प्रियांका गाताडी (कोप्रोली), किशोर पाटील (सारडे) तसेच शिवपार्वती भजन मंडळ (वशेणी) आदी गायक कलाकारांच्या सुरावटीतून मराठी-हिंदी गीतांचा आनंद रसिकांना घेता येणार असल्याची माहिती वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्र म्हात्रे यांनी दिली.