पर्यावरण पुरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

। पेण । वार्ताहर ।
गर्जा रायगड तर्फे गणेश उत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पेण तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन गर्जा रायगडचे संपादक संतोष पाटील यांनी केले आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे संकंट असून देखील गणेशभक्ताने मोठया प्रमाणात या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावर्षी देखील असाच सहभाग अपेक्षित आहे. या स्पर्धेच्या अटी व नियम अशाप्रकारे आहेत. बाप्पाची आरास ही पर्यावरणपुरक असावी. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजर्नाथ क्रमांक काढण्यात येतील. विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येतील. 4 सप्टेंबर 2022 पर्यंत बाप्पाच्या सजावटीचे छायाचित्र या 7798266800, 9028285264 व 8446150414 या क्रमांकावर व्हॉटस्अ‍ॅप करावे. त्यानंतर आलेल्या सजावटींच्या फोटोंचा विचार केला जाणार नाही. तसेच फोटोमध्ये कोणत्याही प्रकारची एडिटींग ग्राह्य धरली जाणार नाही.

Exit mobile version