निबंध स्पर्धांचे आयोजन

| कर्जत | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांमध्ये राजमाता जिजाऊ फाऊंडेशनतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा अणि वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास राजमाता जिजाऊ फाऊंडेशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. पुजा सुर्वे त्यांच्या समवेत सदस्या वर्षा पवार, सुवर्णा सुर्वे, मेधा राउत, मनीषा पवार, कांचन देशमुख, पंकेश जाधव, गणेश पिरकर व गावातील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी अ‍ॅड. सुर्वे यांनी मुलींना मार्गदर्शन केले अणि सावित्री बाईच्या स्त्रियाच्या योगदाना बद्दल माहिती दिली. तसेच भाषण अणि निबंध स्पर्धामधील विजेते मुला मुलींना बक्षीसे देण्यात आली.

Exit mobile version