। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांच्यावतीने 15 डिसेंबरला दी मराठा लाईट इन्फट्री सेंटर, बेळगाव येथील शिवाजी स्टेडियमवर माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.
या मेळाव्यात विविध रेकॉर्ड ऑफिसची पथके, वैद्यकीय पथके उपस्थित राहणार आहेत. ही पथके सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या निवृत्तीवेतन, माजी सैनिकांच्या पत्नी, वारसाच्या नावात बदल, बँकेशी निगडीत अडचणी, आधार कार्ड व त्यासंबंधी इतर समस्यांचे निरसन करणार आहेत. संबंधितांनी आपले सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्र, पीपीओ व बँक पासबुक या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.