| सोगांव | वार्ताहर |
दी लाईफ फाऊंडेशन आणि शंकरा आय हॉस्पिटल – पनवेल, यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राजिप शाळा चोंढी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांची मोफत मोंतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल. मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी येणाऱ्या रुग्णांनी येताना रेशन कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, तसेच मधुमेहाची किंवा रक्तदाबाची औषधे सुरू असल्यास ती सोबत आणावी. शिबिराच्या दिवशी अल्पदरात चष्मे उपलब्ध असतील. तरी सर्व गरजू बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन दी लाईफ फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शिलानंद इंगळे 9325054280, राखी राणे 8830980161, प्रणय ओव्हाळ 8149437371 यांना संपर्क साधावा.