गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील शिवक्रांती सामाजिक संघटनेच्यावतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिवक्रांती संघटना दरवर्षी तालुकास्तरीय गडकिल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तालुक्यातील 20 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील मुलांनी दिवाळी सणात गड किल्ले बांधणी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम करीत आहेत. महाराजांच्या किल्ल्यांप्रती असलेले प्रेम आपल्या कलेच्या माध्यमातून गडकिल्ले बांधणी प्रतिकृती साकारून इतिहास जिवंत ठेवण्याचे काम या लहान मुलांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विवेक भोपी, अविनाश भोईर, आशिष जोशी मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत जय हनुमान ग्रुप पोशिर यांनी मल्हारगड प्रथम क्रमांक पार्थ हरेश सोनावले नेरळ या स्पर्धकांनी पन्हाळगड साकारून द्वितीय क्रमांक मिळविला, ओमकार मित्रमंडळ दहिवलीचा राजा यांनी पद्मदुर्ग किल्ला साकारून तृतीय क्रमांक मिळविला, रमेश झुगरे (पाली) यांनी राजगडगड साकारून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. यावेळी अविनाश भोईर, रोहन लोभी, भास्कर डोईफोडे, मुकुल दळवी, आकाश विरले, रोहित तुपे, आशिष जोशी आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version