गणेशोत्सवाचे आयोजन

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेल्या डोलवहाल या गावी सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीगणेश जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. गणेश व श्री भैरीनाथ मंदिरात उत्सव सोहळा राम आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. याप्रसंगी गणेश जन्मोत्सव, अभिषेक, ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, श्रींची मिरवणूक, वारकरी सांप्रदाय डोलवहाल यांचे सामुदायिक हरिपाठ, बबन वाजंळे नारायणगाव यांची हरिकीर्तन, हरिजागर आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ मेहनत घेत आहेत.

Exit mobile version