आशाताई शिंदे यांच्यावतीने लोहा-कंधार येथे आरोग्य शिबिराचे आयेजन

| लोहा /कंधार | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या संकल्पनेतून लोहा व कंधार येथे अक्यूप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीद्वारे साप्ताहिक उपचार शिबिराचे आयोजन लोहा व कंधार येथे करण्यात आल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना दिली.

कंधार येथे या आरोग्य शिबिराचे उद्घाटन शुकरवारी (दि. 17) होणार असून शिबिराची वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायं. 7 वाजेपर्यंत चालणार असून शिबिराचे ठिकाण श्यामसुंदर शिंदे यांचे संपर्क कार्यालय कंधार येथे आहे व हे आरोग्य शिबिर कंधार येथे 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून कंधार तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी उपलब्ध राहणार असून लोहा येथे या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन 24 फेब्रुवारी रोजी होणार असून सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायं.7 पर्यंत स्थळ आमदार शामसुंदर शिंदे यांचे संपर्क कार्यालय लोहा येथे होणार आहे.

लोहा कंधार येथे हे आरोग्य शिबिर साप्ताहिक आरोग्य शिबिर एक आठवडा रुग्णांच्या सेवेत सुरू राहणार आहे. लोहा व कंधार शहरातील आयोजित या आरोग्य शिबिरात अक्यूप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीद्वारे साप्ताहिक उपचार रुग्णावर करण्यात येणार असून, अक्यूप्रेशर रिसर्च आणि ट्रीटमेंट संस्था जोधपुर राजस्थान यांच्या माध्यमातून लोहा व कंधार तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांसाठी पोटाचे विकार, गॅस, ऍसिडिटी, कब्ज, वजन कमी करणे, लघवीचा त्रास, सांधेदुखी, मणक्याची नस दुखणे व दबणे, थायरॉईड, हातापायात मुंग्या येणे, बीपी व उच्च रक्तदाब शुगर, मधुमेह आदी आजारी रुग्णावर व या आजारावरील आजारावर अक्यूप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीद्वारे साप्ताहिक गरजू रुग्णावर उपचार प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी जितेंद्र सिंह थेरपीष्ट जोधपुर राजस्थान व प्रमोद कुमार थेरपीस्ट जोधपुर राजस्थान हे तज्ञ डॉक्टर रुग्णावर आधुनिक पद्धतीने उपचार करणार असून, लोहा व कंधार तालुक्यातील गरजू रुग्णांनी जास्तीच्या जास्त संख्येने या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शामसुंदर शिंदे यांनी लोहा कंधार मतदार संघातील जनतेला केलेले आहे.

Exit mobile version